
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भारत संकल्पना (आयडिया ऑफ इंडिया) पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि संविधानाप्रती निष्ठेच्या भावनेतून ही निवडणूक लढवत असल्याचे न्या. रेड्डी यांनी सांगितले.