
नवी दिल्लीः आपल्या देशाचे सैनिक चोवीस तास सीमेचं रक्षण करत असतात. परंतु एक असा सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर तैनात असतो, जो मृत्यूमुखी पडलेला आहे. मात्र त्याचा आत्मा आजही देशाची सेवा करतो. या जवानाला शहीद होऊन ४९ वर्षे झाली.
ही गोष्ट आहे हरभजन सिंह यांची. ते आजही सिक्कीम बॉर्डवर तैनात असतात. त्यांना लष्करातील जवान बाबा हरभजन या नावाने ओळखतात. सिक्कीमच्या सीमेवर त्यांचं एक मंदिर उभारलेलं आहे. आपले सैनिक तिथे दर्शनाला जातात आणि मंदिराची देखभाल करतात.