'बाबा का ढाबा'वाले कांता प्रसाद बनले रेस्टॉरंटचे मालक

टीम ई सकाळ
Tuesday, 22 December 2020

एका लहानशा जागेत ढाबा चालवणारे आणि पदार्थांची विक्री होत नसल्यानं रडलेल्या कांता प्रसाद यांचं आयुष्य एका व्हिडिओनंतर अमुलाग्र असं बदललं आहे. 

नवी दिल्ली - इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर बाबा का ढाबा वाले कांता प्रसाद चर्चेत आले होते. त्यानंतर सातत्यानं ते काही ना काही कारणामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आऱोप त्यांनी केला होता. तर आता 'बाबा का ढाबा'चे बाबा कांता प्रसाद रेस्टॉरंटचे मालक बनले आहेत. एका लहानशा जागेत ढाबा चालवणारे आणि पदार्थांची विक्री होत नसल्यानं रडलेल्या कांता प्रसाद यांचं आयुष्य एका व्हिडिओनंतर अमुलाग्र असं बदललं आहे. 

साधा ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांनी आता हाय फाय ढाबा उघडला असून त्यांचा काउंटरवर बसलेला फोटोही व्हायरल झाला आहे. नव्या रेस्टॉरंटसाठी ते महिन्याला 35 हजार रुपयांचं भाडं भरतात. कांता प्रसाद यांच्या नव्या ढाब्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. यामध्ये ढाब्यात येणाऱ्या ग्राहकांवर आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ढाब्यात वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्ज लावण्यात आली आहेत.  

युट्यूबर गौरव वासन याने कांता प्रसाद यांचा रडत असलेला एक व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रसिद्धीच्या झोतात आला. लोकांना तिथं येऊन खाण्याची विनंतही गौरव वासनने केली होती. यानंतर बाबा का ढाबा इथं लोकांनी फक्त गर्दी केली असं नाही तर ऑनलाइन आणि ऑफलाइन आर्थिक मदतही केली. यानंतर कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात वादही झाला. 

हे वाचा - इंजिनियरचा लंपटपणा, 5 दिवसांत केली 2 लग्न अन् ओढून घेतलं विघ्न

कांता प्रसाद यांनी गौरव वासनवर काही आरोपही केले. यामध्ये मदत म्हणून मिळालेले पैसे लाटल्याचा आरोपही केला होता. यावर बाबा कांता प्रसाद यांचा व्हिडिओ करणाऱ्या गौरवने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसंच बाबांची कोणीतरी दिशाभूल करत असून माझ्यावर सूड उगवण्यासाठी हे चाललं आहे असंही म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baba ka dhaba owner kanta prasad start new restaurant in malviy nagar