
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांसह एकूण २७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची चौकशी आता सुरू आहे. दरम्यान, योग गुरू रामदेव बाबा यांनी विमान दुर्घटनेमागे षडंयत्र असल्याची भीती व्यक्त केलीय. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रामदेव बाबा यांना केली आहे. विमान दुर्घटनेमागे तुर्किचा हात तर नाही ना, असं करून त्यांनी बदला घेतला नाही ना अशी शंका रामदेव बाबा यांनी उपस्थित केली.