
रुह अफजा बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे. बाबा रामदेव यांचे विधान अक्षम्य आहे आणि त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. हे विधान कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. त्यानंतर दुपारी १२ वाजता न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली तेव्हा बाबा रामदेव यांच्या वकिलाचा दृष्टिकोन नरम झाला आणि त्यांनी न्यायालयाला सांगितले की मी सल्ला दिला आहे आणि आम्ही व्हिडिओ काढून टाकत आहोत. बाबा रामदेव यांनी रुह अफजाला 'शरबत जिहाद' म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.