कुस्तीपटू बबिता फोगट पित्यासह भाजपमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आमीर खानच्या "दंगल' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या विशेष झोतात आलेली जागतिक कुस्तीपटू बबिता फोगट व तिचे वडील महावीर यांनी आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी हरियाना विधानसभा निवडणुकीत भाजपला यामुळे फायदा होण्याची आशा आहे. बबिताने अलीकडेच हरियानाच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचे जोरदार समर्थन केले तेव्हाच ती भाजपवासी होणार असल्याची चर्चा होती. ती आज खरी ठरली.

नवी दिल्ली - आमीर खानच्या "दंगल' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या विशेष झोतात आलेली जागतिक कुस्तीपटू बबिता फोगट व तिचे वडील महावीर यांनी आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी हरियाना विधानसभा निवडणुकीत भाजपला यामुळे फायदा होण्याची आशा आहे. बबिताने अलीकडेच हरियानाच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचे जोरदार समर्थन केले तेव्हाच ती भाजपवासी होणार असल्याची चर्चा होती. ती आज खरी ठरली.

बबिता व महावीर फोगट यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी दोघांनीही भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. महावीर फोगट यांनी हरियानाच्या ग्रामीण भागात आपल्या गीता व बबिता या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय कुस्तीक्षेत्रात भारताची मान व शान उंचावली. 2014 मधील ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या बबिताने मागच्या वर्षी गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्टकुल स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली. गुरू द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या आखाडा या आत्मकथनपर पुस्तकावर आमीर खान याने "दंगल' हा चित्रपट बनविला. त्यात त्याने स्वतः महावीर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात अफाट यश मिळवल्यावर महावीर तसेच फोगट भगिनी विशेष प्रसिद्धीच्या झोतात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: babita phogat entry in bjp with father politics