बाबूल सुप्रियोंचं गाणं वाजणार त्यांच्याच विरोधात; बंगाल पोटनिवडणुकीत भाजपचा डाव

बाबूल सुप्रियोंचं गाणं वाजणार त्यांच्याच विरोधात; बंगाल पोटनिवडणुकीत भाजपचा डाव
Updated on

कोलकता : भाजपमध्ये असताना बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यासाठी गायलेले गाणे भाजप पोटनिवडणुकीच्या प्रचारात वापरणार आहे. सुप्रियो आता तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.

बाबूल सुप्रियोंचं गाणं वाजणार त्यांच्याच विरोधात; बंगाल पोटनिवडणुकीत भाजपचा डाव
CM ठाकरेंकडून क्षीरसागरांची मनधरणी; काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारास तयार

बालीगंज मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या मतदार संघातून तृणमूल काँग्रेसने बाबूल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्या विरुद्ध प्रचार करताना भाजप त्यांनीच गायलेल्या गाण्याचा आधार घेणार आहे. `हे टीएमसी नो मोर` हे २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत लोकप्रिय होते आणि भाजपने प्रचारात त्याचा वापर केला होता. आता पुन्हा एकदा याचा वापर भाजप करणार आहे.

राज्यमंत्री सुव्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे बालीगंजची जागा रिक्त झाली होती. बाबुल सुप्रियो हे असनसोलचे भाजप खासदार होते, त्यांनी आपल्या जागेचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलने असनसोलमधून चित्रपट अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आता फॅशन डिझायनर अग्निमित्रा पाल यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली आहे.

बाबूल सुप्रियोंचं गाणं वाजणार त्यांच्याच विरोधात; बंगाल पोटनिवडणुकीत भाजपचा डाव
नितेश राणेंची जीभ घसरली! AIMIM च्या प्रस्तावावरून अश्लील वक्तव्य

बालीगंजमध्ये, तृणमूलने दिवंगत सुव्रत मुखर्जी यांच्या स्मृती सभेचे रविवारी आयोजन करून प्रचाराची सुरुवात केली आहे. या मतदार संघात बाबूल सुप्रियो यांच्याविरुद्ध भाजपने किया घोष यांना रिंगणात उतरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com