

Uttar Pradesh Minister Baby Rani Maurya during her visit to Hathras, where she addressed questions about payments collected from PM Awas Yojana beneficiaries
esakal
उत्तर प्रदेशच्या महिला कल्याण, बालविकास मंत्री बेबी राणी मौर्य यांच्या एका विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून कागदपत्रे तयार करण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये घेतले जात असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री असलेल्या बेबी राणी मौर्य यांनी हाथरस येथील रामनपूरमध्ये आयोजित चौपालमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकल्या. यावेळी माध्यमांनी लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केल्याच्या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.