
Operation Sindoor: पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा देशभरात चांगलाच बोलबोला झाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी या सैनिकी ऑपरेशनचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, एक विशेष बातमीही समोर आली आहे. ही बातमी म्हणजे एका नवजात बालिकेचं नाव तिच्या पालकांनी 'सिंदुरी' असं ठेवलं आहे. या कुटुंबाला झालेला आनंद आणि त्यांच्यातील देशभक्तीची यामुळं सर्वत्र चर्चा सुरु आहे.