
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झालीय. गंगोत्री यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिरानंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही उघडणार आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजी शुक्रवारी २ मे रोजी सकाळी सात वाजता उघडले. त्यानंतर आता बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तयारी पूर्ण झालीय. रविवारी सकाळी ६ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. दरवाजे उघडण्याआधीच भाविकांनी बद्रिनाथ मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे.