Bageshwar Baba Networth : अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप होणाऱ्या बागेश्वर बाबाची संपत्ती बघाल तर, अवाक् व्हाल

बागेश्वर धाम येथील पीठाधिश्वर किर्तनकार बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप झाला.
Bageshwar Baba Networth
Bageshwar Baba Networthesakal
Updated on

Dhirendra Krishna Shastri Net Worth : महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शाम मानव यांनी बागेश्वर धामा येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. बागेश्वर धाम महाराज आणि वाद असं समीकरण फार जुनं आहे. मध्य प्रदेशात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायम चर्चेत राहतात.

त्यांच्या किर्तनाला नेते, मोठे प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात. नागपूर इथे झालेल्या किर्तनात त्यांच्या कथित चमत्कारीक शक्तींना आव्हान देण्यात आलं होतं. या शक्ती सार्वजनिकरित्या सादर करा नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार रहा असं सांगण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकारात बाबा स्वतःच प्रतिपक्षाला उत्तरं देत आहेत.

कोण आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री?

  • धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कुटुंबाची आर्थिकस्थिती बरीच खराब होती. एकेकाळी त्यांच्या घरात खाण्या-पिण्याचीही आबाळ होती. एक साधसं घर होतं ते पावसाळ्यात गळायचं.

  • धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म ४ जुलै १९९६ मध्ये मध्यप्रदेशच्या छतरपूरच्या जवळ असलेल्या गडागंज गाव इथे झाला होता. त्यांचं समपूर्ण कुटुंब तिथेच राहत होतं.

Bageshwar Baba Networth
Daya Nayak Net Worth : खरंच एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायककडे कोट्यावधी रुपये आहेत?

अंतर्यामी असल्याचा दावा

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दावा आहे की, ते लोकांच्या मनातलं ओळखू शकतात म्हणजे ते अंतर्यामी आहेत. त्यांच्याकडे येणारे भाविक आपल्या समस्या सांगण्या आधीच ते ती समस्या आणि त्याचं समाधान एका कागदावर लिहून देतात.

त्यांच म्हणणं आहे की, ध्यान धारणा केल्याने त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली आहे. व्यक्ती समोर आली की त्यांना जाणीव होते आणि ते त्यानुसार ओळखतात. हनुमानाच्या कृपेने हे शक्य होतं असं ते म्हणतात.

Bageshwar Baba Networth
Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, लाइफस्टाईल अन्...

किती आहे संपत्ती?

  • उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांची प्रत्येक महिन्याची कमाई साधारण ३.५ लाख रुपयांपर्यंत आहे.

  • ते रोज साधारण ८ हजार रुपये कमवतात.

  • वर्षाला साधारण ४०-४२ लाख रुपये त्यांच उत्पन्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com