
Bagpat Battle : 'स्वतंत्र भारताचा पहिला चाट विद्रोह', बागपत लढाईला 2 वर्षे पूर्ण; Memes Viral
लखनऊ : उत्तरप्रदेशातील बागपत येथे दोन वर्षापूर्वी हाणामारीची एक घटना घडली होती. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. चाट व्यवसायिकांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. तर या घटनेचा व्हिडिओ दोन वर्षापूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता या व्हिडिओवर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
"स्वतंत्र भारतातील हा पहिला चाट विद्रोह असून यामध्ये फोटोमध्ये दिसणाऱ्या सर्वांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या पराक्रमाने देशभरातील जनतेला स्तब्ध केलं आहे. व्हिडिओमधील चाचाचे नाव इतिहासात नोंद होणार आहे. त्यांचे स्वेटर ८० किलोचे तर त्यांच्या डोक्यावरील केसाची झोपडी ५ किलोची आहे" अशा पद्धतीचे कॅप्श टाकून या आरोपींचा फोटो शेअर करण्यात येत आहे.

Baghpat Battle Memes
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओला आज दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. चाट मसाला विक्रेत्या व्यावसायिकांचे काही कारणावरून भांडणे झाले होते. या भांडणाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्यांनी लाठ्याकाठ्यानी हाणामारी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यामधील एक व्यक्ती खाली पडल्यानंतरही काठीने मारताना दिसत आहे. या व्यक्तीला नेटकऱ्यांकडून टार्गेट केलं जात आहे.