esakal | बलियातील खून प्रकरण : मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

बलियातील खून प्रकरण : मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला अटक

धीरेंद्र प्रताप सिंह हा भाजपचा स्थानिक नेता असून, त्याला विशेष तपास पथकाने लखनौमध्ये अटक केली. धीरेंद्र हा बलियातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा जवळचा कार्यकर्ता मानला जातो.

बलियातील खून प्रकरण : मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला अटक

sakal_logo
By
पीटीआय

बलिया, लखनौ - उत्तर प्रदेशातील बलियामधील हत्येप्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याच्यासह तिघांना पोलिसांनी आज अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धीरेंद्र प्रताप सिंह हा भाजपचा स्थानिक नेता असून, त्याला विशेष तपास पथकाने लखनौमध्ये अटक केली. धीरेंद्र हा बलियातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा जवळचा कार्यकर्ता मानला जातो. तर उर्वरित दोघांना वैशालीमधून अटक करण्यात आली. धीरेंद्रला पकडण्यासाठी पोलिसांच्या १२ तुकड्या करण्यात आल्या होत्या. धीरेंद्र सोमवारी न्यायालयात शरण येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. त्याने शनिवारीच न्यायालयात यासाठी अर्जही केला होता. धीरेंद्रची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी ५० हजार रुपयांचे इनामही जाहीर केले होते. आतापर्यंत धीरेंद्रचे भाऊ देवेंद्र आणि नरेंद्र यांच्यासह दहा जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुर्जनपूरमध्ये १५ ऑक्टोबर रोजी पंचायत भवनामध्ये बैठक सुरू होती. उपविभागीय न्यायदंडाधिकारी सुरेश पाल, मुख्याधिकारी चंद्रकेशसिंह, ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी गजेंद्र प्रतापसिंह आणि रेवती पोलिस ठाण्यातील पोलिस उपस्थितीत होते. एका मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर धीरेंद्रसिंह याने तेथे उपस्थित असलेल्या जयप्रकाश पाल (वय ४६)  यांचा खून केला व तो तेथून पळून गेला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image