
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलांनी हल्ल्यांची तीव्रता वाढविलेली असताना, बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी सैन्याला जोरदारपणे लक्ष्य करण्यात येत आहे. बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत ३९ ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचा दावा ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) केला आहे.