भाजप आमदाराच्या वक्तव्याने कर्नाटकात वाद उफाळणार; म्हणाले...

BJP MLA Renukacharya
BJP MLA RenukacharyaBJP MLA Renukacharya
Updated on

कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे थांबलेला नाही तोच मदरशांच्या (Ban madrassas) संदर्भात नवा वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे भाजप आमदार एमपी रेणुकाचार्य यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि शिक्षणमंत्र्यांना राज्यातील मदरसे बंद करण्याची विनंती केली आहे. मदरशांमध्ये देशविरोधी धडे दिले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.

राज्यात मदरशांची काय गरज आहे? एकतर मदरशांवर बंदी घातली पाहिजे किंवा राज्यातील इतर शाळांमध्ये जे शिकवले जाते ते तिथे शिकवावे. अशा शाळा नाहीत का जिथे सर्व धर्माचे विद्यार्थी शिकतात, असेही एमपी रेणुकाचार्य यांनी मदरशांवर (Ban madrassas) प्रश्न उपस्थित करीत म्हटले.

BJP MLA Renukacharya
नील, किरीट सोमय्या आणि नीलेश राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

हिजाबच्या (hijab) वादावरून काही देशविरोधी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे. हा इस्लामिक देश आहे का? हे आम्ही सहन करणार नाही. देशविरोधी संघटनांच्या कर्नाटक (Karnataka) बंदचा काँग्रेस (Congress) नेत्यांनी सभागृहात बचाव केला, असेही एमपी रेणुकाचार्य म्हणाले.

रेणुकाचार्य यांचे असे विधान पहिल्यांदाच आले नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. काँग्रेस (Congress) नेत्याच्या ट्विटची खिल्ली उडवत त्यांनी प्रियांका गांधींनी त्यांच्या वक्तव्यात ‘बिकिनी’ सारखा शब्द वापरणे घृणास्पद असल्याचे म्हटले होते. कॉलेजमध्ये शिकताना मुलांनी पूर्ण कपडे घालावेत. आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो. इतकेच नाही तर महिलांच्या कपड्यांमुळे बलात्काराच्या घटना वाढत असल्याचेही रेणुकाचार्य यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com