गणपतीच्या पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा HCच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court

गणपतीच्या पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा HCच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर घातलेल्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले की, २०२० मध्ये पर्यावरण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यामध्ये मूर्ती पर्यावरणपूरक असायला हव्यात, असे म्हटले होते. मात्र विसर्जनाबाबतही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीओपी मूर्ती नदीत विसर्जित करू शकत नाहीत. त्यासाठी कृत्रिम तलाव किंवा पाण्याच्यात टाकीत विसर्जन करण्याच्या सूचना आहेत.

यावर CJI DY चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही नैसर्गिक मातीपासून मूर्ती बनवा. हायकोर्टाच्या आदेशात आम्ही कोणताही बदल करणार नाही. वास्तविक पाहता, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मद्रास उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींच्या विक्रीवर बंदी घातली होती. याचिकाकर्त्याने सांगितले की, पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते.