हिजाब वाद पुन्हा उफाळला; आता जत्रेत मुस्लिमांना दुकान लावण्यावर बंदी I Hijab Ban | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Festival 2022

उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटना जत्रा आयोजन समित्यांवर दबाव आणत आहेत.

हिजाब वाद पुन्हा उफाळला; मुस्लिमांना जत्रेत दुकान लावण्यावर बंदी

बंगळुरु : गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी (Hijab Ban) घातली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कर्नाटकातील हिजाब परिधान थांबण्याचं नाव घेत नाहीय. अनेक मुस्लिम संघटना याला सातत्यानं विरोध करत आहेत. या संघटनांनी गेल्या आठवड्यात राज्यात बंदची हाकही दिली होती. दरम्यान, आता कर्नाटकातील किनारी भागात होणाऱ्या जत्रांमध्ये मुस्लिम संघटनांना (Muslim Organizations) दुकान थाटण्यास मनाई केली जात असल्याचं वृत्त आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटना (Hindu Organization) कथितरित्या आयोजन समित्यांवर दबाव आणत आहेत. इथं जत्रांमध्ये मुस्लिमांनी दुकान थाटावं, असं त्यांना वाटत नाहीय. कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी कायम ठेवल्यानंतर अनेक मुस्लिम दुकानदारांनी निषेध म्हणून दुकानांचं शटर बंद केलं होतं.

हेही वाचा: माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीवर प्राणघातक हल्ला; मांझी म्हणाले..

दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या किनारी भागातील मंदिरांमध्ये जत्रा (Jatra) भरत असतात. त्यातून करोडोंचा महसूल गोळा होतो. 20 एप्रिल रोजी होणाऱ्या महालिंगेश्वर मंदिराच्या (Mahalingeshwar Temple) वार्षिक उत्सवाच्या (Hindu Festival 2022) आयोजकांनी मुस्लिमांना लिलावात सहभागी होण्यास बंदी घातलीय. 31 मार्च रोजी होणाऱ्या बोलीमध्ये फक्त हिंदूच सहभागी होऊ शकतील, असं आयोजकांनी स्पष्ट केलंय. मात्र, मंदिर प्रशासनानं याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय. त्याचप्रमाणं उडुपी जिल्ह्यातील कौपमधील होसा मारिगुडी मंदिरानं या आठवड्यात होणाऱ्या वार्षिक जत्रेसाठी 18 मार्च रोजी झालेल्या लिलावात मुस्लिमांना स्टॉल देण्यास नकार दिलाय. मंदिर प्रशासन समितीचे अध्यक्ष रमेश हेगडे म्हणाले, दुकानांच्या लिलावात फक्त हिंदूंनाच सहभागी होण्याची परवानगी देणारा ठराव आम्ही मंजूर केलाय, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: रामायण मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीनं 2.5 कोटींची जमीन केली 'दान'

Web Title: Ban On Setting Up Shop For Muslims At Mahalingeshwar Temple Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnatakahigh court
go to top