विमानातील मांसाहारावर यावी बंदी; जैन नेत्यांची ज्योतिरादित्य शिंदेंकडे धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानातील मांसाहारावर यावी बंदी; जैन नेत्यांची ज्योतिरादित्य शिंदेंकडे धाव

विमानातील मांसाहारावर यावी बंदी; जैन नेत्यांची ज्योतिरादित्य शिंदेंकडे धाव

राजकोट: फ्लाईट्समध्ये मांसाहारी अन्नपदार्थांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. एका शुद्ध शाकाहारी व्यक्तीला चुकून मांसाहीर जेवण दिलं गेल्याने नाराज झालेल्या गुजरात अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यांनी ही मागणी केली आहे. देशांतर्गत विमानांमध्ये मांसाहारी पदार्थ देण्यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. बोर्डाचे सदस्य आणि काही जैन समुदायाच्या नेत्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून त्यांनी सर्व विमान कंपन्यांना मांसाहार बंद करण्यासंदर्भातील विनंती केली आहे. (Gujarat Animal Welfare Board)

हेही वाचा: तातडीने कामावर हजर व्हा, एसटी संपावर कोर्टाचा मोठा निर्णय!

या बोर्डाचे सदस्य राजेंद्र शाह यांनी 30 मार्च रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहून म्हटलंय की, “ही विनंती शाकाहारी प्रवाशांच्या वतीने केली जात आहे. फ्लाईट्समध्ये मांसाहारी खाद्यपदार्थ दिले गेल्याने शाकाहारी प्रवाशांच्या भावना दुखावल्या जात आहेत. शाकाहाराबाबत अत्यंत कठोर असणाऱ्या व्यक्तींना जेंव्हा मांसाहारी जेवण आणून दिलं जातं तेंव्हा तर ते फारच नाराज होतो आणि त्यांना याचा बराच त्रासही होतो.

ही सगळी मागणी फ्लाईटमध्ये घडलेल्या एका प्रकारानंतर होत आहे. टोकियो-दिल्ली फ्लाइटमध्ये एका शुद्ध शाकाहारी प्रवाशाला चुकून मांसाहार दिल्याच्या एका घटनेनंतर तीव्र रोष सुरु झाला आणि मांसाहार बंदीची मागणी सुरु झाली. त्यासंदर्भातील पत्रही लागलीच पाठवण्यात आलं. यासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, “मी या प्रवाशांशी बोललो आहे. जे कांदा, लसूण आणि बटाटाही खात नाहीत, त्यांना मांसाहार देण्यात आला. यामुळे त्याचे पालकही प्रचंड नाराज झाले होते, म्हणून मी सरकारला मांसाहार बंद करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली, पण... फडणवीसांचा आरोप

भारतीय प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य मित्तल खेतानीही म्हणाले की, “हा मुद्दा फक्त शाकाहारी वा मांसाहारी अन्नाचा नसून स्वच्छतेचाही आहे. मांसाहाराचा दर्जा नेहमीच संशयास्पद ठरतो. फ्लाइट्समध्ये, बर्याच लोकांना मांसाहारी अन्न पचण्यास कठीण वाटतं, म्हणून फक्त शाकाहारी जेवण दिले जाणंच चांगले आहे."

तर दुसरीकडे राजकोटच्या वर्धमान नगर जैन देरासरचे विश्वस्त प्रकाश शाह म्हणाले की, “आम्ही लोक काही भाज्यादेखील खात नाही कारण त्यामध्ये कीटक असतात. अशावेळी कुणी आपल्या शेजारी बसून मांसाहार घेतो तेव्हा आम्हाला किती वाईट वाटतं याची कल्पना कोणी करू शकत नाही. सरकारने फ्लाइट्समधील मांसाहारावर बंदी घालावी अशी आमची इच्छा आहे.

Web Title: Ban Sought On Non Vegetarian Food On Indian Flights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top