काश्‍मीरमध्ये फुटीरवाद्यांचा ‘बंद’

पीटीआय
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

काश्‍मीर खोऱ्यात ‘कलम ३७०’ वगळल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, पाच महिन्यांच्या खंडांनंतर २५ जानेवारीला टू जी इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली. अफझल गुरूच्या फाशीला सात वर्षे  पूर्ण झाल्याने जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटने (जेकेएलएफ) ‘बंद’ पुकारला होता.

श्रीनगर - संसद हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरूच्या फाशीला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काश्‍मीर खोऱ्यात विशेष खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फुटीरवाद्यांनी ‘बंद’चे आवाहन केले होते आणि संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी सकाळीच इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, सायंकाळी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू  करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्‍मीर खोऱ्यात ‘कलम ३७०’ वगळल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, पाच महिन्यांच्या खंडांनंतर २५ जानेवारीला टू जी इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली. अफझल गुरूच्या फाशीला सात वर्षे  पूर्ण झाल्याने जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटने (जेकेएलएफ) ‘बंद’ पुकारला होता; तसेच जेकेएलएफच्या निवेदनाला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोन्ही पत्रकारांची पाच तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी या संघटनेविरुद्ध गुन्हा दाखल केला. यादरम्यान बंदमुळे काश्‍मीरमधील जनजीवन विस्कळित झाले. बाजारपेठ आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंदच राहिली. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सेवाही ठप्प होती. काश्‍मीर खोऱ्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. २००१ च्या संसद हल्लाप्रकरणी दोषी दहशतवादी अफझल गुरूला २०१३ रोजी तिहार तुरुंगातच फाशी दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Band in kashmir