esakal | भाजप खासदाराने वाजंत्र्यांसोबत धरला ताल, बँड पथक झाले 'अनलॉक' (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

MP Shankar, marriage functions,  Indore MP

कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत असताना  लग्न-समारंभाला परवानगी मिळाली होती मात्र बँड पथकावरील निर्बंध कायम होते. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश बँड संघाने थेट शंकर लालवानी यांची भेट घेतली होती.  

भाजप खासदाराने वाजंत्र्यांसोबत धरला ताल, बँड पथक झाले 'अनलॉक' (VIDEO)

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

इंदूर : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या बँड पथकाचा आवाज मध्यप्रदेशात अखेर दुमदुमला. बँड पथकातील लोकांनी  चक्क भाजप खासदार शंकर लालवानी यांच्यासोबत याचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत असताना  लग्न-समारंभाला परवानगी मिळाली होती मात्र बँड पथकावरील निर्बंध कायम होते. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश बँड संघाने थेट शंकर लालवानी यांची भेट घेतली होती.  

भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू

खासदार शंकर लालवानी यांच्या हस्तक्षेपानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी बँड पथकाला कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली. प्रशासनाने यासंदर्भातील आदेशही जारी केले. सरकारने आदेश दिल्यानंतर बेरोजागर झालेल्या बँड पथकातील वाजंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या निर्णयाचे त्यांनी बँड वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे भाजप खासदार शंकर लालवानी हे देखील बँड पथकातील कलाकारांच्या आनंदात सामील झाल्याचे पाहायला मिळाले.  

शंकर लालवानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, एका नवरदेवाने देखील त्यांना लग्न समारंभासाठी  बँड आणि बँजो पथकांला परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली होती. भलेही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभाला परवानगी मिळाली असली तरी आयुष्यातील महत्त्वाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी लग्न समारंभात बँडची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आल्याचे लालवानी यांनी सांगितले होते.