Bangalore Crime News
esakal
भुवनेश्वरीनगरमध्ये आई विजयालक्ष्मी हिने दोन मुलांचा गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
कौटुंबिक कलहातून ही शोकांतिका घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बंगळूर : बंगळूरच्या बागलगुंटे येथील भुवनेश्वरीनगरमध्ये एका आईने कौटुंबिक कलहातून आपल्या दोन लहान मुलांची (Bangalore Crime News) हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Woman Kills Kids) आहे. मृतांमध्ये आई विजयालक्ष्मी (वय ३०), मुलगी वृंदा (वय ४) आणि मुलगा भुवन (वय दीड वर्षे) यांचा समावेश आहे.