बंगळुरु : प्रेशर कुकरमध्ये घरातच बनवायचा ड्रग्ज; पोलिसांची धाड, आणि...| Bangalore crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
बंगळुरु : प्रेशर कुकरमध्ये घरातच बनवायचा ड्रग्ज; नायजेरियन नागरिकाला अटक

बंगळुरु : प्रेशर कुकरमध्ये घरातच बनवायचा ड्रग्ज; पोलिसांची धाड, आणि...

बंगळुरु पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्रॅंचनं ड्रग्ज प्रकरणात एका नायजेरियन नागरिकाला (Nigerian culprit arrested) अट केलीय. रिचर्ड सायरिल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी त्याच्या राहत्या घरातच प्रेशर कुकरमध्ये एमडीएमए क्रिस्टल (mdma crystal drug) ड्रग्ज बनवायचा. याबाबत पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून खबर मिळताच त्यांनी हेजराघट्टा येथील ताराबन्नाहल्ली येथे सायरिलच्या घरावर सोमवारी १० जानेवारीला धाड टाकली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ५० लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केला. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Bangalore central crime branch arrested Nigerian culprit in drug crime and seized 50 lacs raw material)

हेही वाचा: कर्नाटक : पोलिसांनी केला 201 किलो गांजा जप्त; आंध्रप्रदेशची टोळी जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सायरिल त्याच्या मोठ्या भावासोबत व्यवसायीक व्हिसाद्वारे २०१९ मध्ये भारतात आला होता. दोन महिन्यांपूर्वी तो ताराबन्नाहल्ली येथे स्थलांतर झाला. या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 930 ग्रॅम (methylsulfonyl)मिथेन, ५८० ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड क्रिस्टल, ५ लिटर अॅसिड, १० लिटरचे प्रेशर कुकर, एक पाईप, वजनाची डिजिटल मशिन, दोन मोबाईल आणि एक स्कुटर असा ५० लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केलाय.

"सायरिलचा मोठा भाऊ या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे. इंटरनेटच्या माध्यामातून या आरोपींनी MDMA क्रिस्टल हे ड्रग्ज बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रेशर कुकरमध्ये कच्चा माल उकळवून त्याच्यावर प्रक्रिया करुन ड्रग्ज बनवलं जायचं. याप्रकरणी आरोपींविरोधात एनडीपीएसच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत." अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bangaloreDrugcrime update
loading image
go to top