बंगळूर : लॉटरीच्या नावाखाली ४० कोटी रुपये गोळा करून सुधा आणि सिद्धीराजू हे जोडपे फरार झाले आहेत. ही घटना बंगळूरच्या (Bangalore Lottery Scam) जरागनहळ्ळी येथे घडली. २० वर्षांपासून जरागनहळ्ळी येथे राहणाऱ्या या जोडप्याने लॉटरीच्या व्यवसायाच्या नावाखाली ६०० हून अधिक लोकांकडून पैसे जमा केले होते.