
आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती.
धक्कादायक! कर्नाटकात गायींसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य, आरोपीला अटक
बंगळुरु : गेल्या काही वर्षांत मुक्याप्राण्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील बंगळुरुमधून (Bangalore Karnataka) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका 34 वर्षीय व्यक्तीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करताना अटक केलीय. या आरोपीनं अनेक गायींसोबत असे अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
हा आरोपी येथील एका विद्यालयाच्या परिसरात झाडांच्या मागे जात गायींसोबत (Cow) अनैसर्गिक कृत्य करायचा. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आलीय. मंजूनाथ असं या आरोपीचं नाव आहे. तो मांड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलागेरे गावातील रहिवासी आहे. मंजूनाथच्या मित्रानं दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.
पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती. त्यामुळं तो बंगळुरुमधील एका विद्यालयाच्या मैदानात जात. तिथं चरायला येणाऱ्या गायींना झाडांच्या मागे नेत अनैसर्गिक कृत्य करायचा. याबाबतची माहिती मंजूनाथच्या मित्रानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मंजूनाथला गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मंजूनाथवर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केलाय.