Hijab: हिजाब वादातून बंगळूरच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका निलंबित

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिजाब घातल्याने मोठा गोंधळ
Muslim girls have been protesting for hijab.
Muslim girls have been protesting for hijab.Esakal

बंगळूर : सध्या राज्यातील महाविद्यालये बंद असली तरी प्राथमिक शाळा सुरू आहेत. आता हा हिजाब वाद( Hijab Row) प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचला असून, बंगळूर (Bengalur) शहरातील एका शाळेत मुलींनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिजाब घातल्याने मोठा गोंधळ झाला.

Muslim girls have been protesting for hijab.
Hijab: हिजाब प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर; भारताने केली भूमिका स्पष्ट

बंगळूर शहर आतापर्यंत वादातून दूर होते; मात्र काल चंद्रा ले आऊटमधील एका शाळेतील काही मुलींना हिजाब काढण्यास सांगण्यात आले. एका शिक्षिकीने वर्गातील बोर्डवर हिजाब आणि मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह लिहिल्याचा आरोप करून विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या आरोपावरून शाळेतील त्या शिक्षिकेला संचालक मंडळाने निलंबित केले आहे. संबंधित शाळेत या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हायस्कूल आणि कॉलेजमध्ये सुरू असलेला हिजाबचा वाद आता प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचला आहे.

त्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालकांनी शाळा मंडळाविरोधात रोष व्यक्त केला आहे. पालकांनी संचालक मंडळाविरोधात संताप व्यक्त केला आहे. संचालक मंडळ आणि पालकांमध्ये झालेल्या वादावादीमुळे गोंधळ निर्माण झाला. पोलिसांकडून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी चर्चा सुरू ठेवली आहे. बंगळूर दक्षिण विभागाचे डीजीपी राजेंद्र यांनी घटनास्थळी भेट दिली व सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. फलकावर आक्षेपार्ह लेखन केल्याच्या आरोपावरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षिकेशी चर्चा केली; परंतु त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त आपण काहीच लिहिले नसल्याचे सांगितले. परंतु, पालकांच्या आग्रहावरून संचालक मंडळाने शिक्षिकेला निलंबित करण्याची कारवाई केली.

हिजाब वादाची सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याआधी अंतरिम आदेश देणाऱ्या उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कोणत्याही मुलांनी धार्मिक पोशाख घालू नये, शाळेत केवळ गणवेश घालण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु लोक त्याची दखल घेण्यास तयार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com