Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

स्वतःच्याच घरातील बाथरुममध्ये एका २० वर्षीय तरुणांचा थरकाप उडवणाऱ्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
murder case
murder case eSakal

बंगळुरु : स्वतःच्याच घरातील बाथरुममध्ये एका २० वर्षीय तरुणांचा थरकाप उडवणाऱ्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तिच्या मानेवर आणि मनगटावर वार करण्यात आले असून बाथरुममधील पूलमध्ये रक्त्याच्या थारोळ्यात ती आढळून आली. पोलिसांना या ठिकाणी एक चिठ्ठी देखील सापडली आहे. बंगळुरु शहरात ही घटना घडली आहे. (Bengaluru crime body of young woman was found in bathroom with her throat cut mother is human rights activist)

murder case
Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

प्रबुध्या असं या तरुणीचं नाव असून तिचा भाऊ घरी आला पण त्याला आपली बहिण घरात कुठेही दिसली नाही त्यामुळं त्यानं बाथरुमचा दरवाजा वाजवला. पण तिथूनही त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पण जेव्हा त्यानं बाथरुमचा दरवाजा तोडला आणि समोर पाहतो तर काय? त्याच्या बहिणीचा मृतदेह हा रक्ताळलेल्या पूलमध्ये पडलेला होता. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची केस दाखल केली असून याचा तपासही सुरु केला आहे. या ठिकाणी पोलिसांना एक एक चिठ्ठी देखील आढळून आली असून ही चिठ्ठी मृत तरुणीनं लिहिली आहे की इतर कोणी याचा तपास पोलीस घेत आहेत.

murder case
Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

हा खून की आत्महत्या?

तरुणीच्या कुटुंबियांनी हा दावा केला आहे की, आपल्या मुलीचा कोणीतरी खून केला आहे. कारण जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. या घटनेनंतर तरुणीची आई सौम्या यांना मोठा धक्का बसला असून आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आपल्याला न्याय मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सौम्या यांनी म्हटलं की, "माझी लेक माझी खूपच लाडकी होती, मी एक मानवाधिकार कार्यकर्ता आहे. माझी मुलगी ही धाडसी होती, ती खरं बोलायला मागे पुढे पाहत नव्हती. तिच्यासोबत जे काही घडायचं ते ती कायम मला सांगायची. पण यावेळी काय घडलंय हे माहिती नाही. जर कोणी तिचा शत्रू असेल तर तिच्या खूनासाठी तोच जबाबदार असला पाहिजे. पण मला माहित नाही काय झालं आहे, मला न्याय हवा आहे. माझी मुलगी खूप धाडसी मुलगी होती"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com