Bangladeshi Man Arrested: धक्कादायक! नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून

Transgender Disguise: जाणून घ्या, नेहा किन्नर बनून राहणाऱ्या या भामट्याने कोणती बनावट कागदपत्रं बनवली होती.
Bangladeshi Man Arrested: धक्कादायक!  नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून
esakal
Updated on

Bangladeshi Man Lived as Transgender for 20 Years: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पोलिसांनी स्वत:ला किन्नर दाखवून प्रदीर्घ काळापासून राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकास अटक केली आहे. आरोपीचं खरं नाव अब्दुल कलाम आहे आणि तो नेहा किन्नर या नावाने अनेक वर्षांपासून शहरात राहत होता.

पोलिसांच्या मते तो वयाच्या १७ व्या वर्षी भारतात आला होता आणि येथे राहून बनावट भारतीय कागदपत्र बनवून घेत आपली खरी ओळख त्याने लपवून ठेवली होती. एवढी कागदपत्र त्याने बनवून घेतली होती.

प्राप्त माहितीनुसार, नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलाम आधी महाराष्ट्रात राहिला नंतर भोपाळमधील मंगलवारा आणि बुधवारा भागात तो राहू लागला. त्याने भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड, मतदार कार्ड साररखी महत्त्वाची कागदपत्रं बनवून घेतली होती आणि समाजात स्वत:ला पूर्णपणे किन्नर असल्याचे दर्शवलं.

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक!  नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून
Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

पोलिसांच्या गुप्तचर पथकास माहिती मिळाली होती की, नेहा बांगलादेशी नागरीक आहे आणि वैध कागदपत्रांविना भारतात राहत आहे. यानंतर तलैया ठाणे पोलिसांनी कारवाई करत जवळपास आठवडाभरापूर्वी त्याला ताब्यात घेतलं.

पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, नेहाची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. वर्ष २०१९मध्ये त्यावर एमपी नगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपीची चौकशी केली जात आहे.

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक!  नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

भोपाळ पोलीस आयुक्तांनी सांगितलं की शहरात अवैधरित्या राहत असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटवण्याचे अभियान सुरू आहे. आतापर्यंत नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलामबाबत हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आलेले नाही. परंतु चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला बांगलादेशला पाठवण्याची तयारी केली जात आहे.

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक!  नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयित व्यक्तीची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून शहरात अवैध हालचाली आणि बनावट दस्तावेजांवर लगाम लावला जाईल. आता या प्रकरणामुळे शहरातील परदेशी नागरिकांच्या उपस्थितीवरून पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com