
Drunk Man’s Head Stuck in Liquor Shop Grill: Viral Video : दारूच्या आहारी गेलेला माणूस, दारूच्या एका घोटासाठी काय करेल याचा काही नेम नाही. दारू नाही मिळाली तर त्याचा जीव कासावीस होवू लागतो. एकवेळेस जेवण नाही मिळालं तर चालेल पण त्याला दारू पाहीजेच असते. मग ती मिळवण्यासाठी तो प्रसंगी जीवाचीही पर्वा करत नाही, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे.
या घटना पाहून कधी आश्चर्य वाटतं, कधी राग येतो, कधी धक्का बसतो तर कधी त्यातून घडलेल्या गमतीमुळे हसू देखील येतं. असाचा काहीसा प्रकार आता समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक पोटधरून हसतही आहेत.
दारूचं दुकानातून आणखी एक दारूची बाटली मिळते का हे पाहण्यासाठी एका दारूड्याने एक बाटली हाती असतानाही दुसऱ्या बाटलीसाठी दुकानच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये डोकं घातलं आणि काही हाती लागतंय का पाहीलं. मात्र खरी गंमत येथेच झाली. त्याचं डोकं त्या खिडकीतच फसलं. काही केल्या डोकं बाहेर निघेना, त्याची सगळी दारूची नशा उतरली अन् तो घामाघूम झाला. हे पाहून उपस्थितांना हसू आवरेना. त्यातील कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ केला आणि तो व्हायरलही झाला.
थोडावेळाने उपस्थितांपैकीच काहींना त्याची फजिती पाहावेना, म्हणून त्यांनी त्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी विविध प्रय़त्न सुरू केले. काहींनी गज वाकवण्याचा प्रय़त्नही केले. तर काहींनी त्या दारूड्यालाच सुनावलं, काहीजण म्हणाले बरी शिक्षा मिळाली, तर काहींनी त्या लोखंडी खिडकीचे गज बळ लावून ओढायचे प्रयत्न केले, अखेर कशीबशी त्याची अडकलेली मान निघाली. पण त्या दारूड्याला आता चांगलीच अद्दल घडल्याचे दिसत होते.
हा व्हिडिओ chhattisgarh_fanny_torr नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. शिवाय, वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.