BJP MP Extortion case: तेजस्वी सुर्याकडून भाजपच्या नेत्याला खंडणीचा फोन, पैश्यांबरोबरच मागितले हिरे..

Tejaswi Surya Extortion: भारतीय जनता पक्षाचे दक्षिण बंगळूरचे खासदार तेजस्वी सुर्या यांच्या फोनवरुन गुजरातच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका नेत्याला खंडणीचा फोन आला होता. या कॉलमध्ये त्याला पैसे आणि हिरे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
tejaswi surya
tejaswi suryaEsakal

Tejaswi Surya Phone Theft: भारतीय जनता पक्षाचे दक्षिण बंगळूरचे खासदार तेजस्वी सुर्या यांच्या फोनवरुन गुजरातच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका नेत्याला खंडणीचा फोन आला होता. या फोनवरुन त्याला पैसे आणि हिरे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तेजस्वी सुर्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत ते म्हणाले की त्यांच्या फोनचा वापर खंडणीसाठी करण्यात आला.

तेजस्वी सुर्या यांचे वैयक्तिक सल्लागार बानू प्रकाश व्ही यांनी दक्षिण सीइएन ठाण्यात तेजस्वी सुर्याच्या वतीने तक्रार दाखल केली. या तक्रारीत ते म्हणाले की सुर्या कामात व्यस्त असल्याने फोन माझ्याकडे होता आणि त्या फोनवरील आलेल्या कॉल्सला मी उत्तर देत होतो.

यापुढे ते म्हणाले की, १ जुलै या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाचे युनिट अध्यक्ष प्रशांथ कोराट यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या फोनवरुन कॉल करण्यात आला होता. त्यानंतर कोराट यांनी झालेली घटना सांगण्यासाठी सुर्याच्या क्रमांकावर कॉल केला होता, पण तेव्हा त्यांना समजले की सुर्याकडून कोणताही कॉल करण्यात आला नव्हता.

या तक्रारीत प्रकाश यांनी आरोप केलाय की तेजस्वी सुर्याचा फोन कोणीतरी चोरला आणि फोन सोडण्याआधी कोराट यांना खंडणीचा कॉल केला.

tejaswi surya
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

याबाबात दक्षिण सीइएन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अ‍ॅक्टच्या कलम ६६(सी), कलम ६६(डी) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ अंतर्गत फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

tejaswi surya
Sharad Pawar: अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com