कर्नाटकची राजधानी बेंगळुरूत अतुल सुभाष या इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 24 पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये अतुलने पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. पत्नीच्या नातेवाईकांवरही त्याने छळ केल्याचा आरोप केला आहे. पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल केल्याचा उल्लेखही त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. पत्नीकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा दावाही सुसाईड नोटमध्ये केला आहे.