बदली करण्याचा सरकारला अधिकार : डी. रूपा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

बंगळूर: "बदली करण्याचा सरकारला अधिकार आहे. मी आदेशांचे पालन करत आहे,'' अशी भूमिका आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी आज स्पष्ट केली. तसेच त्यांनी आज आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली.

बंगळूर: "बदली करण्याचा सरकारला अधिकार आहे. मी आदेशांचे पालन करत आहे,'' अशी भूमिका आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी आज स्पष्ट केली. तसेच त्यांनी आज आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली.

अण्ण द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची तुरुंगात बडदास्त ठेवली जात आहे, असे रूपा यांनी उघड केले होते. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने रविवारीच त्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. त्यांच्यासह तुरुंग महानिरीक्षकांचीही बदली करण्यात आली होती आणि रूपा यांनी जाहीर केलेल्या माहितीच्या चौकशीचे आदेशही राज्य सरकारने दिले होते. रूपा यांच्या 16 वर्षांच्या सेवाकाळात 26 बदल्या झाल्या आहेत.
""अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सरकारला अधिकार आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल व माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार,'' असे रूपा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, डी. रूपा यांच्या बदलीविरोधात आज सकाळी कर्नाटकातील भाजपच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर निदर्शने केली. डी. रूपा यांची अचानक का बदली केली याचे सरकाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या वेळी भाजपच्या खासदारांनी केली.
रूपा यांच्या बदलीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकचे पोलिस महासंचालक आर. के. दत्ता म्हणाले, ""डी. रूपा यांना महत्त्वाच्या पदावर पाठवण्यात आले आहे. रस्ता सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांची सर्व पदे ही महत्त्वाचीच असतात. डी. रूपा यांची बदली ही शिक्षेसाठीची बदली नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banglore news d roopa ips officer and government