Bank Holiday December 2025
esakal
देश
Bank Holiday December 2025 : बँकेची कामं आधीच उरकून घ्या! डिसेंबरमध्ये १७ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा...
State-Wise Holiday List : डिसेंबर महिन्यात एकूण १७ दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्याचा परिणाम बँकांच्या कामावरही होणार आहे. असं असलं तरी डिजिटल व्यवहार मात्र सुरु राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात सण-उत्सव आहेत. त्यामुळे अनेक राज्यांत वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. अशावेळी तुम्हाला जर बँकेचं कोणतं महत्त्वाचे काम असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिसेंबर महिन्यात विविध राज्यात एकूण १७ दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्याचा परिणाम बँकांच्या कामावरही होणार आहे.
