ग्राहकांनो, बँकेची कामे आताच उरकून घ्या कारण....

टीम ई-सकाळ
रविवार, 22 सप्टेंबर 2019

केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकांच्यां विलिनीकरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला बँक कर्मचारी विरोध करत आहेत.

मुंबई : केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकांच्यां विलिनीकरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला बँक कर्मचारी विरोध करत आहेत.

आणखी वाचा : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का! भास्कर जाधवांच्या हाती धनुष्यबाण...

कधी असणार कामकाज बंद?
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, आणि नॅशन ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिस या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विलिनीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बँकांच्या विलिनीकरणामुळे अनेक कर्माचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते २७ अशा दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. त्यानंतर २८ सप्टेंबरला चौथ्या शनिवारची सुटी असणार आहे. तर २९ सप्टेंबरला रविवारची सुटी असणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी ग्राहकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच बँकांची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

आणखी वाचा : उदयनराजेंचं ठरलं; भाजपप्रवेशाबाबत घेतला मोठा निर्णय

काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  1. केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला विरोध
  2. दैनंदिन कामकाजात रोखीच्य व्यवहारांची वेळ कमी करावी
  3. पाच दिवसांचा आठवडा करणे
  4. ग्राहकांच्या सेवाकरामध्ये कपात करावी
  5. गारात वाढ करण्याची ही मागणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank workers union announcement of three days strike in last week september