
उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, श्रावण महिन्याच्या सोमवारी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. श्रावण महिन्याच्या सोमवारी पौराणिक औसनेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले. दरम्यान विजेची तार तुटली आणि मंदिराच्या पत्र्यावर पडली, यामुळे काही लोकांना विजेचा धक्का बसला, ही माहिती मिळताच भाविकांत गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली, यात दोघांचा मृत्यू झाला आणि ३८ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.