Nitin Gadkari
sakal
नवी दिल्ली: ‘‘शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास उपग्रहाच्या मदतीने खते व औषधांवरील खर्च निम्म्याने कमी होतो, त्याचप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या स्थितीविषयीची सर्व माहिती मिळवता येते,’’ असे सांगत केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या सहकार्यातून कृषी क्षेत्रात सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे कौतुक केले. दिल्लीत आयोजित किसान कुंभ-२०२६ कृषी संमेलनात ते बोलत होते.