Love Jihad : विशाल बनून चांदबाबूनं हिंदू मुलीला अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात अन् केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bareilly Uttar Pradesh Love Jihad

आरोपी तरुण आधीच विवाहित असून तो दोन मुलांचा बाप आहे.

Love Jihad : विशाल बनून चांदबाबूनं हिंदू मुलीला अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात अन् केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly Uttar Pradesh) इथं लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतराचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. इथं चांद बाबूनं 'विशाल'ची भूमिका साकारत एका हिंदू मुलीला (Hindu Girl) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.

आरोपी तरुण आधीच विवाहित असून तो दोन मुलांचा बाप आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलीय. पिलीभीतच्या जहानाबाद (Jehanabad) येथील रहिवासी असलेल्या आरोपी चांद बाबूनं आपलं नाव डॉ. विशाल सांगून मुरादाबाद (Moradabad) येथील एका हिंदू मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, असा आरोप तरुणीनं केलाय.

हेही वाचा: Asaduddin Owaisi : भाजप नेत्याला अटक होताच ओवैसींनी मुस्लिम समाजाला केलं 'हे' आवाहन

'तुला कुठंही तोंड दाखवता येणार नाही'

चांद बाबूनं मुलीवर अनेकदा बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोही बनवले. सुमारे दीड महिन्यापूर्वी पीडितेला तो विशाल नसून फसवणूक करणारा असल्याचं समजलं. यानंतर मुलीनं चांद बाबूशी दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीनं तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 'तुझे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकून मी तुझी बदनामी करीन, तुला कुठंही तोंड दाखवता येणार नाही', अशी धमकी त्यानं दिली.

Bareilly Uttar Pradesh Love Jihad

Bareilly Uttar Pradesh Love Jihad

हेही वाचा: 6G in India : भारत 6G लाँच करण्याच्या तयारीत; PM मोदींनी केली मोठी घोषणा

मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव

यानंतर चांद बाबूनं काल रात्री पीडितेला धमकावून बरेली इथं आणलं. चांद बाबूनं तरुणीला कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील बन्स मंडईतील मन्नत लॉनमध्ये नेलं, तिथं पीडितेनं 112 वर कॉल करून पोलिसांना बोलवलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली. सीओ सिटी स्वेता यादव यांनी सांगितलं की, चांद बाबूनं विशाल बनून एका मुलीला लव्ह जिहादची शिकार बनवलं आणि तरुणीला जेव्हा समजलं की, तो तरुण विशाल नसून चांद बाबू आहे, तेव्हा चांद बाबूनं मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. आरोपीवर धर्मांतर, बलात्कार आणि प्राणघातक हल्ला अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Web Title: Bareilly Uttar Pradesh Love Jihad Religious Conversion Man Arrested For Raping Hindu Girl Moradabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..