Asaduddin Owaisi : भाजप नेत्याला अटक होताच ओवैसींनी मुस्लिम समाजाला केलं 'हे' आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

18 जातीय गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या निलंबित भाजप नेत्यावर 101 गुन्हे दाखल झाले आहेत.

Asaduddin Owaisi : भाजप नेत्याला अटक होताच ओवैसींनी मुस्लिम समाजाला केलं 'हे' आवाहन

हैदराबाद : पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यानंतर भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह (T Raja Singh) यांना तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police) पुन्हा एकदा अटक केलीय. राजा सिंह यांच्या विरोधात हैदराबादमध्ये निदर्शनं सुरू आहेत. त्यामुळं त्यांना अटक करून चेरलापल्ली तुरुंगात पाठवण्यात आलंय.

दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम समाजातील (Muslim Community) लोकांना शुक्रवारच्या नमाजासंदर्भात मोठं आवाहन केलंय. टी राजा सिंह यांना ताब्यात घेण्याची आणि निलंबनाची मागणी आता पूर्ण झालीय, असं ओवैसींनी एका निवेदनात म्हटलंय. ओवैसींनी लोकांना आता कोणतंही प्रदर्शन न करता शांततेनं शुक्रवारची प्रार्थना पूर्ण करण्यास सांगितलंय.

हेही वाचा: Arvind Kejriwal : बैठक संपातच सर्व आमदारांना घेऊन केजरीवाल पोहोचले राजघाटवर..

ओवैसींनी हैदराबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं की, ''मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, शुक्रवारच्या नमाजानंतर अशा कोणत्याही घोषणा देऊ नका, ज्यामुळं देशाच्या सौहार्दाला खीळ बसेल.'' टी राजाला अटक करण्याची आमची सर्वात मोठी मागणी होती, जी आता पीडी कायद्यांतर्गत पूर्ण झालीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जातीय गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या निलंबित भाजप नेत्यावर 101 गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा: भाजपचं 'ऑपरेशन लोटस्' फेल, 'आप'च्या बैठकीत किती आमदार पोहोचले? भारद्वाजांनी सांगितला आकडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. राजा सिंह यांना 25 ऑगस्ट रोजी 1986 च्या कायदा क्रमांक 1 अंतर्गत म्हणजेच पीडी कायदा, हैदराबाद पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आलंय. अधिकाऱ्यानं सांगितलं की, राजा हे प्रक्षोभक भाषणं देत आहेत आणि राज्यात हिंसक वातावरण निर्माण करत आहेत, असं नमूद करण्यात आलंय.

हेही वाचा: महागठबंधन सरकार स्थापन होताच सभापतीही बदलणार; लालूंच्या मित्राची निवड निश्चित!

Web Title: Aimim Chief Asaduddin Owaisi Appeals To Ensure Peaceful Friday Prayers After Bjp Leader T Raja Singh Detention Telangana Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..