
कर्नाटकात नवा मुख्यमंत्री? गृहमंत्र्यांच्या दिल्लीवारीने चर्चा
बंगळूर : कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई (home minister of karnataka) यांनी बी. एस. येडियुराप्पा (B.S. yediyurappa) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या जागी आपली निवड होणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. बोम्मई (basavaraj bommai) व येडियुराप्पांचे पुत्र विजयेंद्र दिल्लीला गेल्याने राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त होते. नवी दिल्लीहून (new delhi) परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. (basavaraj bommai statement on karnataka CM changed discussion)
सर्व जण कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी (covdi-19 control) संघर्ष करीत असताना आपण अशा गोष्टींचा विचारही करू नये. अशा परिस्थितीत या विषयावर चर्चा करणेही अयोग्य आहे. ते म्हणाले, की शुक्रवारच्या आमच्या राष्ट्रीय राजधानीच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नव्हते. आम्ही केवळ कोविड- १९ संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्याबरोबर त्यांच्या दिल्ली भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व देण्यात येत होते. बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विश्वासातील मंत्री म्हणून पाहिले जाते. उच्च न्यायालयाच्या (high court) ऑक्सिजन पुरवठ्यावरील हस्तक्षेपावरून येडियुराप्पा प्रशासनावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडण केले.
हेही वाचा: परिचारिका दिन विशेष : आबालवृद्धांसाठी नर्सच बनल्या पालक
राज्यासाठी सध्याचे ऑक्सिजन वाटप (oxygen distribution) ९६५ टन आहे. कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. अन्य राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे आणि स्थानिक पातळीवर तयार होणारा सर्व ऑक्सिजन राज्यातच वापरला पाहिजे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास टँकरची कमतरता असल्याची बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली, असे त्यांनी सांगितले.
Web Title: Basavaraj Bommai Statement On Karnataka Cm Changed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..