esakal | Batla House encounter : इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा हत्येप्रकरणी अरिझ खान दोषी; १५ मार्चला सुनावणार शिक्षा

बोलून बातमी शोधा

Ariz Khan _batla house encounter}

अरिझ खान एन्काऊंटर स्थळावरुन पळून गेला होता, त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक झाली होती.

Batla House encounter : इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा हत्येप्रकरणी अरिझ खान दोषी; १५ मार्चला सुनावणार शिक्षा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बाटला हाऊस एन्काउंटरप्रकरणी दहशतवादी अरिझ खान याला दिल्लीच्या साकेत कोर्टानं दोषी ठरवलं आहे. यानंतर १५ मार्च रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अरिझ खानला दिल्ली पोलिसांनी २०१८ मध्ये नेपाळमधून अटक केली होती.

कोर्टाने आर्म्स अॅक्ट आणि भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०७ अंतर्गत अरिझ खानला दोषी ठरवलं आहे. २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर अरिझ खान हा फरार झाला होता.  त्यानतंर फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. 

बाटला हाऊस इन्काऊंटरमध्ये जीव गमावलेल्या इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा यांच्या हत्येसाठी अरिझला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. कोर्टाने अरिझला दोषी ठरवताना तपास अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, अरिझच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती घेऊन ती कोर्टासमोर सादर करावी. यानंतरच कोर्ट हे निश्चित करेल की त्याच्या कुटुंबाकडून किती दंड वसूल केला जाऊ शकेल. 

कोण आहे अरिझ खान?

 1. अरिझ खान ऊर्फ जुनैद हा बॉम्ब बनवण्यासह तो प्लान्ट करुन स्फोट घडवून आणण्यात एक्सर्प्ट आहे. 
   
 2. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य आहे. 
   
 3. २०१८ मध्ये अटकेपूर्वी तो मोस्ट वॉन्डेट गुन्हेगार होता.
   
 4. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला २०१८ मध्ये भारत-नेपाळ बॉर्डरवरुन अटक केली होती.
   
 5. इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या दहशतवादी संघटनांना पुनरुज्जीवित करण्याचा त्याचा मानस होता. 
   
 6. अरिझवर २००७ मध्ये युपी स्फोट, २००८ मध्ये जयपूर साखळी स्फोट, २००८ मध्ये अहमदाबाद स्फोटाचाही आरोप आहे. बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर तो तात्काळ फरार झाला होता. 
   
 7. बाटला हाउस एन्काऊंटरनंतर एका महिन्यानंतर तो काही काळ भारतात आला होता. 
   
 8. बाटला हाउस एन्काऊंटर १९ सप्टेंबर २००८ रोजी झाला होता. यामध्ये दोन संशयीत दहशतवादी मारले गेले होते तर दोन संशयीतांना अटक झाली होती. 
   
 9. पीटीआयच्या एका वृत्तानुसार, बाटला हाऊस एन्काऊंटरदरम्यान अरिझ खान बाटला हाऊसमध्ये अन्य चार दहशतवाद्यांसोबत होता. 
   
 10. एन्काऊंटरनंतर दिल्लीच्या जामिया नगरमधून तो पोलिसांच्या ताब्यातून सुटण्यात यशस्वी ठरला होता.