"बाटला हाउस'ला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 August 2019

निर्मात्यांनी बदल करण्यास मान्यता दिल्यामुळे "बाटला हाउस' हा चित्रपट 15 ऑगस्टला दाखविण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिली. न्या. विभू बाखरू यांनी या संदर्भातील आदेश दिला. बाटला हाउस चकमकप्रकरणी खटला सुरू असलेले अरिझ खान आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले शहझाद अहमद हे या संदर्भातील याचिकाकर्ते आहेत. चित्रपटातील काही दृश्‍यांना त्यांनी आक्षेप घेतला होता.

नवी दिल्ली - निर्मात्यांनी बदल करण्यास मान्यता दिल्यामुळे "बाटला हाउस' हा चित्रपट 15 ऑगस्टला दाखविण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिली. न्या. विभू बाखरू यांनी या संदर्भातील आदेश दिला. बाटला हाउस चकमकप्रकरणी खटला सुरू असलेले अरिझ खान आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले शहझाद अहमद हे या संदर्भातील याचिकाकर्ते आहेत. चित्रपटातील काही दृश्‍यांना त्यांनी आक्षेप घेतला होता. अहमद यांनी शिक्षेविरुद्ध अपिल केले असून, उच्च न्यायालयात ते प्रलंबित आहे. चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्‍ये वगळण्यास चित्रपट निर्मात्यांनी मान्यता दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Batla house Movie Pemission