

Bay of Bengal low pressure area Maharashtra rain forecast
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Bay of Bengal low pressure area Maharashtra rain : राज्यातील पावसाचा खंड आणि वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसांसाठी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उद्यापासून (ता. ११ सप्टेंबर) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.