दादाच्या अ‍ॅन्जिओप्लास्टीवर निर्णय नाही; डॉक्टरांनी दिली डिस्चार्जसंदर्भात माहिती

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुली यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

कोलकाता : भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांच्यावर सध्या कोलकाताच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय आणि इतर क्षेत्रातील  अनेक दिग्गज मंडळी गांगुलींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करत आहेत. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने गांगुलींच्या तब्येतीसंदर्भात अपडेट दिली आहे. क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुली यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सौरव गांगुली यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

48 वर्षीय सौरव गांगुली यांना योग्य वेळी सर्वोत्तम उपचार देण्यात आले. आणखी दोन कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याने अ‍ॅन्जिओग्राफीची आवश्यकता आहे. पण यासंदर्भातील निर्णय तात्काळ घेण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन दिवसांत गांगुली यांना डिस्चार्ज दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"

शनिवारी जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुली यांच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. गांगुली यांच्यासोबत त्यांची पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशीष आहेत. आयपीएल 2020 स्पर्धेपासून सौरव गांगुली कामात व्यस्त होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bcci president sourav ganguly admitted in hospital clinical update