Video: अस्वलाचा नाद केला, थोबाड फोडून टाकलं! तीन जणांवर जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral News

Video: अस्वलाचा नाद केला, थोबाड फोडून टाकलं! तीन जणांवर जीवघेणा हल्ला

Bear Attack Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये त्या अस्वलानं जीवघेणा हल्ला करुन तीन जणांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत केली आहे. नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता वनप्रशासनाकडून तातडीनं कार्यवाही केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तामिळनाडूच्या एका जंगलातील तो व्हिडिओ असून त्या अस्वलानं तीन जणांवर हल्ला केला आहे. त्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिघेजण आपल्या वाहनावरुन जवळच्या गावात मसाल्याची पाकिटं विकण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे.

जंगलातून जाणाऱ्या व्यक्तींवर केला हल्ला

वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्या व्यक्ती जंगल ओलांडून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होते तेव्हा एका अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. झाडीतून ते अचानक आले आणि त्यानं त्या व्यक्तीवर हल्ला केला. त्या माणसाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत करत तो चेहरा पूर्णत ओरबाडून टाकला. असं म्हटलं जातंय की, लोकांनी अस्वलाला पळवून लावण्यासाठी त्याच्यावर दगडफेक केली होती. त्यामुळे ते अस्वल चिडले होते.

गर्दीवरच चाल करुन गेले....

असं सांगितलं जात आहे की, गर्दी पाहिल्यानंतर त्या अस्वलानं आक्रमक रुप धारण केले होते. गर्दीनं देखील अस्वलाला सातत्यानं डिवचले होते. त्याचा परिणाम असा की, अस्वल थेट गर्दीवरच चाल करुन गेले. यामुळे घाबरलेल्या लोकांनी पळण्यास सुरुवात केली त्यात अनेकांना गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी एकावर अस्वलानं तर जीवघेणा हल्ला केला होता. तो व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लोकांच्या अतिउत्साहीपणामुळे ते अस्वल चिडले होते. असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

अस्वलाच्या धास्तीनं नागरिक घाबरून गेलेत...

सोशल मीडियावर अस्वलाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. वेगवेगळ्या शेयर प्लॅटफॉर्मवर तो दिसून आला आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या परिसरामध्ये आता मोठी दहशत पसरल्याचे दिसून आले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा वनाधिकाऱ्यांना अस्वलाचा बंदोबस्त करण्यास सांगितले होते.