Bee Attack During Cricket Match : क्रिकेटचा सामना सुरू असताना मधमाशांचा हल्ला, अम्पायरचा मृत्यू,खेळाडूंनी मैदानातून पळ काढत वाचवला जीव

Unnao Cricket Incident : वरिष्ठ पंच माणिक गुप्ता यांना ५० हून अधिक दंश झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. दुसरे पंच जगदीश कसाबसा बचावले, तर काही खेळाडूंनी मैदानावर झोपून व काहींनी पळून जीव वाचवला.
Bee Attack During Cricket Match : क्रिकेटचा सामना सुरू असताना मधमाशांचा हल्ला, अम्पायरचा मृत्यू,खेळाडूंनी मैदानातून पळ काढत वाचवला जीव
Updated on

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील शुक्लागंज येथे क्रिकेटचा सामना सुरु असतानाच मधमाशांच्या हल्ल्यात अम्पायरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल सप्रू मैदानावर झालेल्या केडीएमए लीगच्या अंडर-१३ क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे मैदानात गोंधळ उडाला. मधमाश्यांच्या हल्ल्यात कानपूर क्रिकेट असोसिएशन (केसीए) चे वरिष्ठ पंच माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर आणखी एक पंच आणि अनेक खेळाडू जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com