
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. परळीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी आदित्य गित्ते आणि सचिन मुंडे यांनी नंदगौळ येथील युवकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.