
'मी बीफ खावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण?'
'मी हिंदू आहे, वाटल्यास कधीही बीफ खाऊ शकतो'; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
कर्नाटकात (Karnataka) विधान परिषदेच्या निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापलं असतानाच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बीफ (Beef) संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय, त्याची राज्यात जोरदार चर्चा सुरुय. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Former CM Siddaramaiah) म्हणाले, 'मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्लं नाहीय. पण, हवं असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे, असं त्यांनी विधान केलंय.
सिद्धरामय्यांनी तुमकुरूमध्ये (Tumkuru) एका कार्यक्रमाला संबोधित करताना वरील वक्तव्य केलंय. संघाचे लोक (RSS) समुदायांमध्ये भेद निर्माण करत आहेत. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे लोक नसतात. मी हिंदू आहे. परंतु, मी आतापर्यंत बीफ खाल्लेलं नाहीय. परंतु, मला वाटल्यास मी ते खाऊ शकतो. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असा सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा: कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला नरकातच जावं लागेल; अजित पवार संतापले
ते पुढं म्हणाले, बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे नसतात. हिंदूही बीफ खातात, ख्रिस्तीही खातात. इतकंच नाही तर मी एकदा कर्नाटक विधानसभेतही म्हटलं होतं की मी बीफ खावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? हे खाण्याच्या आवडीशी जोडलेला विषय आहे आणि तो आपला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या त्यांच्या विधानावरुन भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Web Title: Beef Ban Beef Eaters Dont Belong To One Community Says Former Cm Siddaramaiah Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..