बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (बीडीसीसी) निवडणुकीच्या (Belagavi BDCC Bank Election) निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण गढूळ बनत चालले आहे. सदस्यांचे अपहरण, दबावतंत्र, हाणामारीचे प्रसंग उद्भवत आहेत. .कित्तूर येथे शुक्रवारी (ता. १२) काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बीडीसीसी बँकेच्या (BDCC Bank) सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे..बीडीसीसी बँकेच्या कित्तूर शाखेसमोर हा प्रकार घडला असून, पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसरत करावी लागली. बॅंकेच्या सचिवांचा अपहरणाचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तसेच मोटारीमधून त्यांची सुटका केली. यामधून ही घटना घडली आहे..'खाकी अंगावर घातली की जात-धर्म विसरा'; अकोला दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्याचे Supreme Court ने का दिले आदेश?.काँग्रेस सदस्यांची संख्या कमी असल्याकारणाने निवडणुकीचा ठराव जाहीर करण्यासाठी आलेले डीसीसी बँकेचे सचिव भीमाप्पा यांचे काँग्रेस सदस्यांनी अपहरण केल्याचा आरोप होत आहे. मोटोरीमधून त्यांना नेताना कित्तूर येथील बँकेच्या शाखेसमोर भाजप सदस्य आणि अन्य कार्यकर्त्यांनी मोटार अडवली. तसेच पोलिसांच्या समोर सचिव भीमाप्पा यांना मोटारीमधून खाली उतरविले. यावेळी झालेल्या जोरदार वादावादी, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. बऱ्याच वेळेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली..मात्र, बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील वातावरण कलुषित बनले आहे. भाजप, काँग्रेस तसेच अन्य कार्यकर्त्यांमध्ये दररोज अशा घटना वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित राजकीय घराण्यांनी बँकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने तसेच बॅंकेवर आपली सत्ता आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा प्रयोग उघडपणे सुरू आहे. यामुळे असे प्रसंग जिल्ह्यातील अनेक गावांत घडत असल्याने अशांतता निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.