Belagav Bike Accidentesakal
देश
हृदयद्रावक घटना! ट्रकच्या धडकेत नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी अंत; पत्नीही गंभीर जखमी, दहा दिवसांपूर्वीच झाला विवाह
Belagav Bike Accident : बिराप्पा याचा राजगोळी येथील श्रीदेवी हिच्याशी दहा दिवसांपूर्वीच विवाह (Marriage) झाला होता. माहेरी आलेल्या श्रीदेवीला बोलावून घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
बेळगाव : अगसगे गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक (Bike Accident) दिल्याने नुकताच विवाह झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. १२) घडली. बीराप्पा लक्ष्मण सैबण्णावर ( वय २६, रा. कुरबरहट्टी, धामणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत पत्नी श्रीदेवी बिराप्पा सैबण्णावर (वय २२) गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात (Kakati Police Station) झाली आहे.