Belagav Black Day
esakal
बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाविरोधात एक नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन (Belagav Black Day Protest) गांभीर्याने पाळला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सकाळी नऊ वाजता निषेध फेरीचे आयोजन केले आहे. या निषेध फेरीत हजारोंच्या संख्येने मराठी भाषक सहभागी होणार आहेत. शहर समिती, तालुका समिती, युवा समिती, महिला आघाडी व शिवसेना याचे नेतृत्व करीत आहे.