Short Circuit Suspected Behind Fire
sakal
बेळगाव,: रात्री गणरायाची पूजा झाली, घरात आनंदाचे वातावरण होते, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र जेवण केले आणि दिवसभराच्या धावपळीनंतर प्रत्येक जण झोपी गेला. मात्र, काही तासांतच या कुटुंबावर काळाने घाला घातला. घरात शॉर्टसर्किट होऊन अचानक लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत दमोने कुटुंबातील चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर गजानन दमोने आणि त्यांचा मुलगा रोशन हे गंभीर जखमी झाले. या घटनेने ढोर गल्ली (चव्हाट गल्लीची मागील बाजू) अक्षरशः हादरून गेली.